उन्हाळी हंगामासाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्यांचे नियोजन

आजपासून आरक्षण खुले

रत्नागिरी : लवकरच उन्हाळी हंगामाला सुरुवात होत असून, कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची आणि पर्यटकांची मोठी संख्या लक्षात घेऊन १६ एप्रिलपासून कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या समन्वयाने सीएसएमटी- मडगाव- सीएसएमटी आणि लोकमान्य टिळक (टी)- मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी) या गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांच्या आरक्षणासाठी आजपासून सुरुवात झाली आहे.

गाडी क्र. ०११७१/०११७२ मुंबई सीएसएमटी – मडगाव जंक्शन – मुंबई सीएसएमटी : गाडी क्रमांक ०११७१ मुंबई सीएसएमटी – मडगाव जंक्शन ही विशेष साप्ताहिक १६ एप्रिल ते ११ जून या कालावधीत दर गुरुवारी मुंबई सीएसएमटीहून रात्री १२ वाजून २० मिनिटांनी सुटेल. ही गाडी त्याच दिवशी दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी मडगाव जंक्शनला पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्र. ०११७२ मडगाव जंक्शन – मुंबई सीएसएमटी १६ एप्रिल ते ११ जून या कालावधीत मडगाव जंक्शन येथून दुपारी ४ वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजून ४५ मिनिटांनी मुंबई सीएसएमटी येथे पोहोचेल.
ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आणि कर्मा रोड, थिविम स्टेशन या स्थानकांवर थांबेल. या गाडीला एकूण २२ डबे असतील. यात २ टियर एसी १ डबा, ३ टियर एसी ६ डबे, स्लीपर ९ डबे, जनरल ४ डबे आणि एसएलआर २ यांचा समावेश असेल.

लोकमान्य टिळक (टी)- मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी) : गाडी क्रमांक ०१११९ लोकमान्य टिळक (टी) मडगाव जंक्शन ही गाडी १७ एप्रिल ते १२ जून या कालावधीत प्रत्येक शुक्रवारी लोकमान्य टिळक (टी) येथून रात्री १२ वाजून ५५ मिनिटांनी सुटणारी ही गाडी त्याच दिवशी दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी मडगाव जंक्शन येथे पोहोचेल.
परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०११२० मडगाव जंक्शन – लोकमान्य टिळक ही दर शुक्रवारी मडगाव जंक्शन येथून दुपारी ४ वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजून ३० मिनिटांनी लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.
ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि कारली स्टेशन या स्थानकांवर थांबेल. या गाडीची रचना एकूण २१ एलएचबी डब्ब्यांची असून, फर्स्ट एसी १ डबा, सेकंड टियर एसी ३ डबे, थर्ड टियर एसी ७ डबे, स्लीपर ८ डबे आणि जनरेटर डबा २ यांचा समावेश असेल.

या दोन्ही गाड्यांच्या आरक्षणासाठी आजपासून सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली , इंटरनेट आणि आयआरसीटीसी वेबसाइटवर सुरू होणार असून, या गाड्यांच्या थांब्यांची आणि वेळापत्रकाची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button