दर्यावर्दी प्रतिष्ठान आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडाधिकारी श्री.विजय शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.विनोद शिंदे,क्रीडासंचालक, गोगटे-जोगळेकर, महाविद्यालय,रत्नागिरी तसेच प्रमुख मान्यवर म्हणून ॲड.अपूर्वा बारगोडे,रत्नागिरी जिल्हापरिषद सदस्य, श्री.निलेशसुर्वे,गुहागर, पंचायत समिती सदस्य,श्रीम. रेणुका ओतारी ,राष्ट्रीय खेळाडू अखिल भारतीय नागरी सेवा बुद्धिबळ व विकास दाभोळकर,अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र मच्छिमार-कष्टकरी खलाशी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

गुहागर: दर्यावर्दी प्रतिष्ठान च्या रौप्य महोत्सवी वर्षा च्या समारोप सोहळ्यानिमित्त जिल्हा कबड्डी असोसीएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडाधिकारी श्री.विजय शिंदे यांच्या शुभहस्ते व लडॉ.विनोद शिंदे,क्रीडासंचालक, गोगटे-जोगळेकर, महाविद्यालय,रत्नागिरी यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाले.

यावेळी दर्यावर्दी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष पावरी ,उपाध्यक्ष भिकाजी पालशेतकर ,सचिव दिनेश जाक्कर व दर्यावर्दी प्रतिष्ठानच्या महिला मंडळ अध्यक्षा सौ.मेघा पाटील यांच्या सोबत संस्थेचे अन्य पदाधिकारी ,कार्यकारी मंडळ सदस्य,सभासद व क्रीडारसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटसमारंभापूर्वी भव्य क्रीडाज्योतीचे आयोजन करण्यात आले होते.
उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पाटील यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button