घरपट्टी, पाणीपट्टी भरून रनपला सहकार्य करा – अमित विलणकर

रत्नागिरी
आर्थिक वर्ष पूर्ण होत असताना रत्नागिरीतील नागरिकांनी घरपट्टी, पाणीपट्टी वेळेत भरून रत्नागिरी नगर परिषदेला सहकार्य करा असे आवाहन नगरसेवक अमित विलणकर यांनी केले आहे.

घरपट्टी, पाणीपट्टी आदी रूपात जमा होणार कर चालू आर्थिक वर्षात जमा व्हावा यासाठी रनप प्रशासन आपल्या पद्धतीने प्रयत्न करत आहे. मात्र नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या रस्ते, पाणी, दिवाबत्ती आदी सुविधा या सुरू ठेवण्यासाठी नागरिकांनी देखील आपली जबाबदारी म्हणून वेळेत कर भरणे आवश्यक असल्याचे अमित विलणकर यांनी सांगितले. लाईट बिल, पंप यांची देखभाल. कर्मचारी पगार आदी नियोजन देखील रनप प्रशासनाला करावे लागते. यासाठी नागरिकांनी गैरसमज करून न घेता रनप प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन अमित विलणकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button