
फुणगूस प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम रखडले
संगमेश्वर ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात या उद्देशाने शासनाकडून कोट्यवधींचा निधी मंजूर केला जातो, मात्र संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाबतीत सध्या उलटी गंगा वाहत असल्याचे चित्र आहे. गेल्या चार वर्षांपासून या आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे आणि विस्तारीकरणाचे काम जिल्हा नियोजन निधीतून मंजूर असतानाही, अद्याप एकही काम पूर्णत्वास गेलेले नाही. या रेंगाळलेल्या कामांमुळे सर्वसामान्य रुग्णांचे मोठे हाल होत असून, स्थानिक जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.www.konkantoday.com




