युद्धजन्य परिस्थितीचा आंब्यांच्या निर्यातीला मोठा फटका बसण्याची शक्यता आब्यांच्या निर्यातीला मोठा फटका बसण्याची शक्यता


मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता भारताच्या कृषि निर्यातीवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या परिस्थितीचा थेट परिणाम कोकणातील हापूस आंब्याच्या निर्यातीवर होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. दि. १५ मार्चपूर्वी परिस्थिती सुरळीत झाली नाही, तर हापूस आंब्यासह इतर आंब्यांच्या निर्यातीला मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याचे महाराष्ट्र राज्य आंबा उत्त्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकाळ यांनी सांगितले.
कोकणातून दरवर्षी दि. १५ ते २० मार्चदरम्यान आंबा निर्यातीच्या हंगामाला सुरुवात होते. विशेषतः अल्फान्सो अर्थात हापूस आंब्याची जगभरात मोठी मागणी असते. भारतातून होणार्‍या एकूण आंबा निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा सुमारे ६० ते ७० टक्के आहे. यामध्ये कोकणातील रत्नागिरी, सिंधुवर्ग आणि रायगड या जिल्ह्यांचे मोक योगदान आहे. या तीन जिल्ह्यांतून दरवर्षी सुमारे एक लाख ७० हजार मेट्रिक टन हापूस आंब्याचे उत्पादन घेतले जाते. त्यापैकी अंदाजे २० ते २५ हजार मेट्रिक टन आंबा थेट परदेशात निर्यात केला जातो.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button