कोलेवाडी सावंत विकास मंडळ आयोजित जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धा संपन्न.

श्री देव गांगोबा प्रथम पालखी नृत्य पथक करंबेळे विजेता.

लांजा ◼️
तालुक्यातील कोलेवाडी सावंत विकास मंडळाने आयोजित केलेल्या भव्य जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेत, श्री देव गांगोबा प्रथम पालखी नृत्य पथक करंबेळे, ता. संगमेश्वर या संघाने विजेतेपद पटकाविले. विजेत्या करबेळे संघाला रोख रु. १०,००० व भव्य चषक देऊन शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष दत्ताजी कदम यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच विजेत्या करंबेळे संघाला श्रीम. सरीता पुंडलिक सावंत यांनी घोषित केलेल्या ५००० रुपयाचे व्यक्तिगत बक्षिस देऊन गौरविण्यात आले.

  ​लांजा तालुक्यातील पूर्व विभागातील उपक्रमशील मंडळ म्हणून नावलौकिक कमावलेल्या कोलेवाडी सावंत विकास मंडळाने प्रथमच शिमगोत्सवानिमित्त कोकणातील पालखी नृत्य परंपरेला प्रसिद्धी मिळावी व या लोककलेचे संवर्धन व्हावे या हेतूने जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेचे दिमाखदार आयोजन केले होते. या स्पर्धेचे उद्घाटन मानकर राजाराम सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, अध्यक्ष राजेश सावंत, समीर सावंत, महेंद्र सावंत, अनिल पालांडे, सतीश सावंत, स्वप्नील सावंत, सौरभ सावंत, नितीन सावंत, प्रवीण सावंत, प्रफुल्ल बने,स्पर्धेचे पंच विकास चव्हाण, कीरण बेर्डे आदि मान्यवर उपस्थित होते.

  शिमगोस्तवा निमित्त कोकणात विविध ठिकाणी पालखी नृत्य स्पर्धांचे आयोजन मोठ्या प्रमाणात केले जाते. कोलेवाडी येथील युवा नेतृत्त्व संदेश सावंत, अभिजित सावंत, सुहास सावंत यांनी या स्पर्धेच्या आयोजना साठी विशेष पुढाकार घेतला होता. ​या जिल्हास्तरीय स्पर्धेत रत्नागिरीतील सात नामांकित संघांनी सहभाग घेतला होता.या प्रत्येक संघाने उत्कृष्ट सादरीकरण केल्याने प्रतेक संघांवर उपस्थित रसिकांनी व्यक्तिगत  बक्षिसांचा वर्षाव केला.अटीतटीच्या झालेल्या या स्पर्धेत करबेळे संघाने प्रथम क्रमांक पटकाविला,तर सिद्धिविनायक पालखी नृत्य पथक तोणदे, रत्नागिरी संघाने उपविजेतेपद पटकाविले. त्यांना रोख रु. ७००० व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तृतीय क्रमांक आई आदिष्टी देवी पालखी नृत्य पथक झर्ये या संघाने पटकाविला, या संघाला रोख रु. ५००० व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.या स्पर्धेत उत्कृष्ट ढोलवादक -मयुर गुरव (सिद्धिविनायक तोणदे ),

उत्कृष्ट ताशावादक -संतोष तोडणकर (सिद्धिविनायक तोणदे ), उत्कृष्ट निशाणधारक – वसंत तावडे (आई आदिष्टी देवी पालखी नृत्य पथक झर्ये ) आणि उत्कृष्ट वेशभूषा – सिद्धेश्वर कृपा उत्कर्ष पालखी नृत्य पथक निवे बुद्रूक या संघाला गौरविण्यात आले.

   कोकण संस्कृतीचे दर्शन घडविणार्‍या तसेच शिमगोत्सवात रंगत आणणाऱ्या या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी *आयोजक  नियोजक युवा नेतृत्व :- संदेश सावंत,अभिजीत सावंत,सुहास सावंत*, अजय सावंत,प्रवीण सावंत,राजु सावंत, मिलिंद सावंत, तुषार सावंत, वैभव बने, सुरज सावंत, जगदीश सावंत, गणेश सावंत, गौरव सावंत, पिंट्या सावंत , प्रितेश सावंत, ओंकार सावंत, भक्ती सावंत, अमिषा सावंत,सेजल सावंत, समृद्धी सावंत. शरद सावंत (पोलिस पाटील ) ओंकार र. सावंत, प्रथमेश सावंत. विवेक सावंत, स्मित प्रदनेश सावंत. परेश ना. सावंत अमोल सावंत यांनी मेहनत घेतली. सर्धेचे सूत्रसंचालन विजय हटकर यांनी केले. 

स्पर्धेत समाविष्ट झालेले संघ व त्यावर पब्लिक कडून बक्षीस चा झालेला वर्षाव

  1. आई आदिष्ठी पालखी नृत्य पथक झऱ्ये रोख रक्कम 4000/-
  2. श्री देव गंगोबा पथक करंबळे संगमेश्वर रोख रक्कम 10800/-
  3. श्री देव धावबा इंदवटी रोख रक्कम 2100/-
  4. वाघजाई मानोबा माघजन संगमेश्वर रोख रक्कम 7350/-
  5. आई वाघजाई मानोबा जय हनुमान पालखी नृत्य माघजन संगमेश्वर रोख रक्कम 6700/-
  6. श्री सिद्धेश्वर कृपा उत्कृष्ट पालखी नृत्य पथक निवे बुद्रुक देवरुख रोख रक्कम 12200/-
  7. सिद्धिविनायक तोनदे रत्नागिरी रोख रक्कम 7400/-
    अशा प्रकारे जिल्हा स्तरीय भव्य दिव्य स्पर्धा संपन्न झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button