
मंडणगड तालुक्यात सोन्याचे दागिने सुरक्षित ठेवण्याचे आमिष दाखवत एका भामट्याने तब्बल २ लाख ७१ हजार १०० रुपयांचा ऐवज लंपास केला
मंडणगड तालुक्यात एका मीटिंगच्या बहाण्याने महिलांना एकत्र जमवून, त्यांच्याकडील सोन्याचे दागिने सुरक्षित ठेवण्याचे आमिष दाखवत एका भामट्याने तब्बल २ लाख ७१ हजार १०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे . या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पोलिसांनी याप्रकरणी ‘फौजदारी पात्र न्यासभंग’ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे .मिळालेल्या माहितीनुसार, ४ मार्च २०२६ रोजी आरोपी चंद्रकांत घाणेकर (रा. तेवरे, ता. चिपळूण; सध्या रा. नाशिक) याने तक्रारदार राजश्री विवेक गायकवाड (वय ५७, रा. विन्हे) आणि त्यांच्यासोबतच्या इतर सहा महिलांना एका नियोजित मीटिंगसाठी माणगाव येथे जायचे असल्याचे सांगितले. या प्रवासादरम्यान महिलांकडील दागिने चोरीला जाऊ नयेत किंवा हरवू नयेत, यासाठी त्याने एक ‘शक्कल’ लढवली.
‘मिटिंगला जाताना एवढे दागिने सोबत नेणे सुरक्षित नाही, ते ऑफिसमध्ये जमा करा,’ असे सांगून त्याने महिलांचा विश्वास संपादन केला. सुरक्षिततेच्या कारणास्तव महिलांनी स्वतःहून आपले दागिने एका लिफाप्यात भरले आणि तो लिफाफा आरोपी घाणेकरकडे सोपवला. मात्र, तो लिफाफा सुरक्षित ठिकाणी ठेवण्याऐवजी आरोपीने महिलांची दिशाभूल केली आणि दागिन्यांसह पोबारा केला.
या फसवणुकीमध्ये सात महिलांचे दागिने आणि मोबाईलचा समावेश आहे




