राजापुरात २२ मार्च रोजी “चैत्र पालवी” मैफलीचे आयोजन

राजापूर : येणाऱ्या वसंत ऋतूच्या स्वागतासाठी मित्रमेळा राजापूरच्या वतीने “चैत्र पालवी” या सुरेल संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २२ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता कलामंदिर राजापूर येथे होणार आहे.
शहरातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील रसिकांना दर्जेदार सांगीतिक, सांस्कृतिक आणि वैचारिक कार्यक्रमांची सातत्याने मेजवानी देणारी ‘मित्रमेळा राजापूर’ ही संस्था गेली अनेक वर्षे सांस्कृतिक क्षेत्रात निष्ठेने कार्यरत आहे. विविध कलाप्रकारांचे कार्यक्रम आयोजित करून रसिकांची अभिरुची जोपासण्याबरोबरच स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही संस्थेमार्फत केले जात आहे.
चैत्र पालवी या बहारदार कार्यक्रमात रत्नागिरीतील प्रसिद्ध व गुणी युवा कलाकार वैष्णवी जोशी नाट्यसंगीत आणि सुगम संगीत तसेच थोडं शास्त्रीय संगीत या प्रकारांतील रसिकप्रिय रचना सादर करणार आहेत.
सुरेल गायन, भावपूर्ण सादरीकरण आणि संगीताच्या विविध छटांनी सजलेली ही मैफल रसिकांसाठी एक आगळीवेगळी पर्वणी ठरणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून मैफिलीचा आनंद घ्यावा आणि कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन मित्र मेळा राजापूर संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button