
आरटीई 25 टक्के च्या सर्व जागांसाठी अर्ज करण्यास 10 मार्चपर्यंत मुदत
रत्नागिरी, दि. 6 ):- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अन्वये व शिक्षण संचालक यांच्या 8 जानेवारी 2026 च्या पत्रानुसार आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया पूर्ण राज्यामध्ये ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. सद्यस्थितीमध्ये आरटीई 25 टक्के साठी 804 जागाच्या प्रमाणात फक्त 488 अर्ज प्राप्त झाले आहेत. पोर्टलवरील 472 अपूर्ण असलेले व शाळा न निवडलेले अर्ज 10 मार्च 2026 पर्यंत पालकांना पूर्ण करण्यासाठी तालुकास्तरावर मदत केंद्र सुरु ठेवून मार्गदर्शन करण्यात यावे. 10 मार्च 2026 अखेर आरटीई 25 टक्के च्या 100 टक्के जागांसाठी अर्ज प्राप्त होतील यासाठी प्रयत्न करावेत, असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) निलिमा नाईक यांनी केले आहे.
सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाच्या मागदर्शक सुचनांची काटेकोर अंमलबजावणी करून आरटीई 25 टक्के प्रवेशाची कार्यवाही करावयाची आहे, तालुका, शाळास्तर व स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर याकरीता प्रयत्न करण्यात यावेत.




