दर्यावर्दी प्रतिष्ठान च्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या समारोप सोहळ्या निमित्त भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे ४ ते ५ मार्च,२०२६ रोजी आयोजन

● रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन च्या मान्यतेने
● जिल्हा क्रीडा अधिकारी श्री विजय शिंदे यांच्या शुभहस्ते होणार उद्घाटन ● क्रीडा संचालक डॉ•विनोद शिंदे लाभणार प्रमुख अतिथी
●पालशेत पंचक्रोशीतील 26 वाडी अध्यक्ष लाभणार प्रमुख मान्यवर

👉दर्यावर्दी प्रतिष्ठान, पालशेत या संस्थेच्या २५ वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचा रौप्य महोत्सव हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा व भावनिक क्षण आहे. समाजहितासाठी समर्पित सेवाभाव, विश्वास आणि एकजुटीच्या बळावर हा प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी संस्थेला २५ वर्षे पूर्ण होत असून, त्यानिमिन्त रौप्य महोत्सवी वर्षाचा समारोप सोहळा दि. ४, ५ व ६ मार्च २०२६ रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. या आनंदोत्सवात आपली उपस्थिती आम्हाला नवी ऊर्जा व प्रेरणा देणारी ठरेल. आपल्या प्रेमळ सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार आणि या ऐतिहासिक क्षणी आपले स्नेहपूर्ण आगमन अपेक्षित आहे.

कार्यक्रम
जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा
कालावधी : दि. ४ मार्च ते ५ मार्च २०२५
बुधवार दि. ४ मार्च २०२६
दु. ४.०० वा. : भव्य क्रीडा ज्योत रॅली
पोमेंडी फाटा ते दर्यावर्दी प्रतिष्ठान क्रीडा नगरी पर्यंत
सायं. ६.०० वा. कबड्डी स्पर्धा उ‌द्घाटन समारंभ
गुरुवार दि. ५ मार्च, २०२६ कबड्डी स्पर्धा समारोप व बक्षीस वितरण समारंभ
प्रमुख अतिथी
मा. अॅड. अपूर्वा बारगोडे-सदस्य, जिल्हा परिषद, रत्नागिरी
मा. श्री. विकास दाभोळकर-अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र मच्छिमार-कष्टकरी खलाशी महासंघ, महाराष्ट्र राज्य
मा. श्री. प्रणव पोळेकर-सदस्य, पंचायत समिती, गुहागर
मा. श्री. दत्ताराम पाटील-अध्यक्ष, जयभारत मच्छिमार सहकारी सोसायटी लि. पालशेत.

स्थळ: दर्यावर्दी प्रतिष्ठान क्रीडानगरी, पालशेत, ता.गुहागर,जि. रत्नागिरी

सूचना : पहिला सामना सायं. ५.०० वाजता सुरु होईल
शुक्रवार दि. ६ मार्च २०२६ रोजी
रौप्य महोत्सव वर्ष समारोप सोहळा

या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
स. ९.०० वा.- श्री सत्यनारायण महापूजा
स.११.०० वा.- महाआरती
दु.१२.०० वा.-महाप्रसाद
दु.३.३० वा. हळदी कुंकू सामारत
प्रमुख वक्त्या : सौ. नमिता प्रसन्ना वैद्य,एम.ए. बीएड. माध्यमिक शिक्षिका, न्यू इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे, ता. गुहागर)
सायं. ७.००वा.-भजन दर्यावर्दी प्रतिष्ठान, पालशेत.
रात्री ८.०० वा.-महाआरती
रात्री १०.०० वा.- फटाक्यांची आतषबाजी
रात्रों १०.१५ वा.-चौरंगी नमन
आभार संस्था (रजि.) संचलित माऊली महिला नमन मंडळ, रत्नागिरी सादर करीत आहे.* वगनाट्य -पौराणिक सीता स्वयंवर
रत्नागिरीतील पहिले महिलांनी सादर केलेले पौराणिक ब्रह्मासत्य गण आणि भन्नाट गौळणीने नटलेले
सूत्रधार : मा. श्री. वासुदेव वाघे
संस्थेच्या वतीने सर्वांना आग्रहाचे निमंत्रण करण्यात आलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button