
रत्नागिरी शहराचा चेहरामोहरा बदलून ’स्मार्ट सिटी’च्या दिशेने वाटचाल
रत्नागिरी शहराचा चेहरामोहरा बदलून ’स्मार्ट सिटी’च्या दिशेने वाटचाल करण्यासाठी उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्या – पुढाकारातून एमआयडीसीच्या माध्यमातून विशेष सुशोभीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी – नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी शहरातील विविध भागांचा दौग करून नियोजित कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी नवीन बस थांबे आणि अत्याधुनिक सार्वजनिक शौचालये उभारण्यासाठी संभाव्य जागांची निश्चिती करण्यात आली. नागरिकांना सहज आणि सुरक्षित – सुविधा मिळाव्यात, यासाठी तांत्रिक बाबींचीही तपासणी करण्यात आली, शहरातील मुख्य रस्त्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी दुभाजकांचे सुशोभीकरण, पादचार्यांसाठी सुरक्षित व सुसज्ज पदपथ उभारणी तसेच सार्वजनिक शौचालयांचे आधुनिकीकरण यावर विशेष भर देण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आकर्षक आणि आधुनिक बस थांबे उभारण्याची योजना आहे. ’या प्रकल्पामुळे रत्नागिरी शहर विकासाच्या नव्या टप्यावर पोहोचेल. शहर अधिक सुंदर आणि पर्यटनासाठी आकर्षक बनेल,’ असा विश्वास नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी व्यक्त केला. या पाहणी दौर्यावेळी शिवसेना गटनेते बाळू साळवी, संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. वाहतुकीला अडथळा न होता नागरिकांना सुविधा मिळतील, याची विशेष काळजी घेत नियोजन करण्यात आले आहे.
www.konkantoday.com




