मुंबई-मडगाव तेजस एक्स्प्रेस या प्रीमियम गाडीच्या प्रवासाचा रविवारी पूर्णपणे उडाला बोजवारा


___ शिमगो उत्सवासाठी रेल्वेने कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी चाकरमान्यांची रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी उसळली होती मात्र, प्रवाशांची पहिली पसंती असलेल्या मुंबई-मडगाव तेजस एक्स्प्रेस या प्रीमियम गाडीचा रविवारी पूर्णपणे बोजवारा उडाला. ही गाडी तब्बल सात तास उशिराने धावत असल्याने मुंबईतील प्रमुख स्थानकांवर प्रवाशांचे हाल झाले.
सकाळी नियोजित वेळेत सुटणारी आणि ठाणे स्थानकात साडेसहा वाजण्याच्या सुमारास येणारी ही गाडी दुपारपर्यंत न आल्याने प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर ताटकळत राहावे लागले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे आणि पनवेल येथे लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण उन्हाच्या कडक झळा सहन करत गाडीची वाट पाहत होते. शिमग्यासाठी उत्साहात निघालेल्या कोकणवासीयांच्या आनंदावर या विलंबामुळे विरजण पडल्याचे चित्र दिसून आले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button