महामार्गावर तपासणी नाके असूनही दारू वाहतूक मोकाट


गोव्यातून सिंधुदुर्गमार्गे चिपळूणकडे विदेशी दारुची बेकायदेशीर वाहतूक करणारी कार सावर्डे पोलिसांच्या जाळ्यात अडकल्यानंतर सीमावर्ती भागासह मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तपासणी व्यवस्थेचा भांडाफोड झाल्याची चर्चा रंगली आहे. पोलिसांनी कारवाई करून दारू जप्त केली असली तरी ठिकठिकाणी असलेले तपासणी नाके नेमके काय करत होते, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
अलिकडे गोवा बनावटीच्या चोरट्या दारुची वाहतूक उघड होत असून हा प्रकार वाढीस लागला आहे. अनेकदा पोलिसांनी अशा दारू वाहतुकीची मोठी वाहने पकडली देखील आहेत. यातूनच दारू वाहतूक करणार्‍यावर एकप्रकारे वचक बसल्यानंतर काही दिवस हा प्रकार थांबतो. मात्र त्यानंतर तो पुन्हा सुरू होत असल्याचे चित्र आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button