
रत्नागिरी शहरात भटके कुत्रे आणि मोकाट गुरांच्या प्रश्नावर न.प.ने घेतला मोठा निर्णय
उनाड गुरे, भटके कुत्रे मुक्तीसाठी ५० लाख रत्नागिरी शहरात गेल्या अनेक दिवसांपासून डोकेदुखी ठरलेल्या भटके कुत्रे आणि मोकाट गुरांच्या प्रश्नावर अखेर नगर परिषदेने महत्वाचा निर्णय घेतला आहे.. नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत या समस्येच्या कायमस्वरूपी निर्मूलनासाठी ५०/लाखांच्या भरीव निधीची घोषणा करण्यात आली असून, यामुळे शहरवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.
केवळ प्रशासकीय दंडुका न वापरता, शास्त्रीय आणि मानवी दृष्टिकोनातून या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी नगरपरिषदेने शहरातील प्राणीमित्रांनाही या मोहिमेत सामावून घेतले आहे. बैठकीत भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण, मोकाट गुरांसाठी सुसज्ज कोंडवाडा आणि प्राण्यांचे आरोग्य यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
प्राण्यांच्या हक्कांचे उल्लंघन न होता नागरिकांची सुरक्षा कशी राखता येईल, यावर या बैठकीत भर देण्यात आला.
कार्यान्वित होणार प्राणीमित्र संघटनांना या समस्येवर एक परिपूर्ण प्रकल्प प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी दिले आहेत हा आराखडा प्राप्त होताच प्रत्यक्ष कामाला परुवात केली जाणार आहे. या बैठकीला सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक मोठ्या उपस्थित होते. त्यांनीकी या प्रस्तावाला एकमताने पाठिंबा दिला आहे.www.konkantoday.com



