विकास कामाचा ठेकेदार कोण हे देखील रत्नागिरी पालिकेला माहित नाही, प्रशासनाचा ढिसाळ कारभार सुरूठाकरे शिवसेनेचे नगरसेवक केतन शेट्ये आणि विलणकर यांचा आरोप


रत्नागिरी पालिकेच्या बाजूलाच जयस्तंभ येथील जुन्या शिक्षण मंडळाच्या जागेत निवारा व निर्जंतुकीकरण केंद्राचे काम सुरू आहे. सुमारे ४८ लाखाचे हे काम असून त्याला स्थगिती असतानाही ते ७० टक्के काम पूर्ण झाले आहे आणि अजूनही सुरू आहे.या विकास कामाचा ठेकेदार कोण हे देखील पालिकेला माहित नाही. एवढा प्रशासनाचा ढिसाळ कारभार सुरू असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक केतन शेट्ये आणि श्री. विलणकर यांनी केला आहे.निवारा केंद्रात रूपांतर करणे आहे. या कामांसाठी एकूण ५९,२४३ रुपये इतके अंदाजपत्रक तपासणी शुल्क भरल्यानंतर प्रत्यक्ष कामाचे मार्ग मोकळे होणार आहेत. सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र. ४ कडून मिळालेल्या माहितीनुसार, पालिकेने पाठवलेल्या प्रस्तावांची छाननी करून काही अटी व शर्तींच्या अधीन राहून ही मंजुरी देण्यात आली आहे. निवारा व निर्जंतुकीकरण केंद्राचे काम जयस्तंभ येथील शिक्षण मंडळाच्या इमारतीची दुरुस्ती करून त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात केंद्र तयार करण्यात येणार आहे. यासाठी ४७,३९,५३५/- रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी मिळाली आहे.या कामाला पालिकेच्या सर्वसाधारण सभेची कोणताही परवानगी नाही. तसेच कामाला स्थगिती देण्यात आली होती. तरी ठेकेदाराने हे काम सुरू ठेऊन आता पर्यंत ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे ठेकेदार कोणाच्या आशिर्वादाने हे काम करत आहे हे माहिती नाही.अचिंबित करणारी गोष्ट म्हणजे या सुमारे ४८ लाखाचे काम कोण ठेकेदार करत आहे हे पालिकेलाच माहिती नाही. पालिका प्रशासनाने या कामालो कोणत्या अटी-शर्थीला आधीन राहून केले आहे हे कळत नाही. त्यामुळे या कामाबाबत आम्ही पुढील सभेमध्ये प्रशासनाला धारेवर धरू, असे शेट्ये आणि विलणकर यांना सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button