दगाफटका करणार्‍यांची गय केली जाणार नाही, पालकमंत्री उदय सामंत यांचा इशारा


रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये ९४ टक्के स्ट्राइक रेट सह घवघवीत यश मिळवले आहे. विजयाचा हा गुलाल उधळतानाच पक्षात राहून बंडखोरांशी मैत्री जपणार्‍यांना आणि दगाफटका करणार्‍यार्‍यांना पालकमंत्री उदय सामंत यानी कडक इशारा दिला आहे, ज्या कार्यकर्त्यांनी मोठी तळमळ करून तुम्हाला निवडून आणल, त्याना विसरलात तर याद राखा, पक्षाशी गद्दारी करणार्‍यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा सामंत यांनी दिला आहे.
यापुढे पक्षाला केंद्रस्थानी ठेवूनच काम केले जाईल, अशा शब्दात विजयी झालेल्या लोकप्रतिनिधींचे सामंत यांनी कान टोचले शहरातील जयेश मंगल पार्क येथे पार पडलेल्या लोकप्रतिनिधीच्या बैठकीत सामंत यांनी कडक भूमिका घेतली आहे. जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत संगमेश्‍वर तालुक्यात आपल्याच काही लोकानी बंडखोरांशी मैत्री जपल्याने शंभर टक्के यशाची संधी हुकल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यापुढे पक्षाशी गद्दारी करणार्‍यार्‍यांची गय केली जाणार नाही, असे सांगत त्यांनी भविष्यात संघटनात्मक कारवाईचे स्पष्ट संकेत दिले तसेच विकास निधी कुणा एकाचा नसून तो शिवसेनेचा आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे, असा टोलाही त्यांनी लगावला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button