ऐतिहासिक वारशाचा जागर.. पोलादपूरमध्ये कदम घराण्याचे ८ वे कुलसंमेलन दिमाखात संपन्न….


पोलादपूर :- राज्यातील ऐतिहासिक आणि पराक्रमी वारसा लाभलेल्या कदम घराण्याचे आठवे भव्य कुलसंमेलन रायगड जिल्ह्यातील पोलादपूर जवळील वडघर येथे नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले. या संमेलनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून कदम बांधव एकत्र आले होते, ज्यामुळे वडघर गावच्या परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. संमेलनाची सुरुवात तेथील ग्रामदेवतेची परवानगी घेवून कदम घराण्याचे कुलदैवत महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीला स्मरण करून तुळजापूरातून आलेले गोंधळीमार्फत जागरण गोंधळाचा धार्मिक कार्यक्रम दि. २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ ते १० वाजेपर्यंत घेण्यात आलेला.
यावेळी पारंपरिक संभळाच्या वाद्यांच्या गजरात आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. दि. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन भव्य शोभायात्रा काढण्यात आली.यानंतर कदम कुलघराण्याचा ध्वजारोपण राज्याचे अध्यक्ष अमरराजे कदम यांच्या हस्ते करण्यात आले.यांनतर कदमवक्षाचे पुजन पुण्याचे माऊलीशेठ कदम यांनी केले.
रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत अण्णा कदम साहेब यांच्या हस्ते वडघर गावचे सुपुत्र उद्योजक रामचंद्र रावजी कदम शेठ यांच्या चित्रचरित्रपर पुस्तक ” शून्य ते शिखर ” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.यानंतर
चंदगडचे डाॅ.सदानंद गावडे ( कदम),छत्रपती संभाजीनगरचे उद्योजक मनोज कदम,कोकण इतिहास परिषद सदस्य प्रवीण कदम यांची कदम घराण्याबद्दल सविस्तर माहितीपूर्ण व्याख्याने खूपच मोलाची ठरली.कुलदेवताचा कुलधर्म याची माहिती तुळजापूरचे मुख्य भोपे पुजारी तथा राज्यप्रमुख अमरराजे कदम यांनी दिली.सुत्रसंचालन व प्रस्तावना राज्याचे सचिव रामजी कदम यांनी केले.यावेळी जिल्ह्याजिल्ह्यातून उपस्थित राहिलेल्या कदम बंधूंचा परिचय घेवून सातारा,
सांगली,गोवा,सिंधुदुर्ग,रत्नागिरी,मुंबई,कोल्हापूर,धाराशिव,बीड,सोलापूर,नांदेड,लातूर,पुणे,अशी एकामागोमाग एक सर्व कदम बंधूंना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं.या संमेलनाचा मुख्य उद्देश विखुरलेल्या कदम बांधवांना एकत्र आणणे, एकमेकांशी परिचय वाढवणे आणि घराण्याचा ऐतिहासिक वारसा तरुण पिढीपर्यंत पोहोचवणे हा होता.कार्यक्रमाला कदम घराण्यातील विविध क्षेत्रांतील दिग्गज, लोकप्रतिनिधी आणि प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या. मान्यवरांनी आपल्या भाषणातून कदम घराण्याचा इतिहास आणि समाजाप्रती असलेल्या कर्तव्यावर प्रकाश टाकला. शैक्षणिक, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या कदम परिवारातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि व्यक्तींचा विशेष गौरव करण्यात आला.
कदम घराणे हे महाराष्ट्रातील एक अत्यंत प्राचीन आणि प्रभावशाली राजघराणे मानले जाते. ‘कदम’ हे नाव कदंब राजवंशाशी जोडले गेले असून, या घराण्याने शिवकाळाच्या अगोदर ही आणि त्यानंतरही स्वराज्याच्या रक्षणासाठी मोठे योगदान दिलेले आहे.या कुलसंमेलनात माजी आमदार संजयजी कदम,नुतन जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत आण्णासाहेब कदम,वडघरचे उद्योगपती रामचंद्र रावजी कदमशेठ,राजूदादा कदम,
दादासाहेब कदम,मुरलीधर कदम,सुधाकर कदम,डाॅ.हरी कदम,किशोर कदम,दत्तारामदादा,
राहुलभाऊ,विमलताई कदम,श्री व सौ.राजेश कदम (कोतवाल) स्वराज कदम,देवळे गावचे पत्रकार प्रकाश कदम,पुण्यातील माजी नगरसेवक सदगुरूनाना कदम साहेब,साखर गावचे भरतशेठ चोरगे कदम,अशोक कदम,भगवान कदम,कृष्णा कदम(पांगुळवाडी),नारायण कदम,सचिन कदम,
सलग तिसऱ्या वर्षीही कदम बंधूंना ” पंढरपुरी चहा ” चा आस्वाद देणारे सारंग कदम,अतुल कदम , गणेश कदम,राम कदम,शशिकांत कदम,नानासाहेब कदम,समाधान कदम,सचिन कदम,विकास कदम,सह असंख्य कदम बंधुभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सोहळ्यामुळे कदम परिवारातील सदस्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, समाज प्रबोधन आणि संघटनात्मक बांधणीसाठी हे संमेलन मैलाचा दगड ठरले आहे. पोलादपूरमधील ग्रामस्थांनीही या सोहळ्याचे स्वागत अत्यंत आदरातिथ्याने केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button