
पुरवठा विभागातर्फे जिल्ह्यात नवीन २१ रेशन दुकाने सुरू होणार
रत्नागिरी जिल्हा पुरवठा विभागाने जिल्ह्यातील विविध तालुक्यामध्ये नवीन २१ रेजन दुकानांना मंजुरी दिली आहे. यामुळे आता अनेक लाभार्थ्यांना धान्यासाठी लांब न जाता आपल्या गावातच धान्य उपलब्ध होणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या ९४९ रेशन दुकाने कार्यरत आहेत. प्रशासनाने २०२५ सालासाठी नवीन अर्जाची मागणी केली होती. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाले होते. प्राप्त अर्जाची छाननी केल्यानंतर जिल्हा पुरवठा विभागाने २१ नवीन जागा निश्चित केल्या आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार या नवीन २१ दुकानांना मंजुरी देण्यात आली असून फी भरणे आणि अनामत रक्कम भरणे या तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही दुकाने लवकरच सुरू होतील. या नवीन मंजुरीमध्ये सर्वाधिक दुकाने रत्नागिरी तालुक्यात आहेत.
www.konkantoday.com




