
रत्नागिरी शहरातील लक्ष्मी केशवनगर परिसरात खिडकीच्या ग्रीलमध्ये चिमुरड्याची मान अडकली, अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे दुर्घटना टळली.
रत्नागिरी शहरातील लक्ष्मी केशवनगर परिसरात बुधवारी दुपारी सात वर्षाच्या चिमुरड्याची मान खिडकीच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
ही घटना एका इमारतीच्या दुसर्या मजल्यावर घडली. संबंधित मुलगा घरातील खिडकीपाशी खेळत असताना त्याचे त्याचे डोके ग्रीलच्या दोन सळ्यांमध्ये अडकले. बाहेर निघण्याचा प्रयत्न करूनही त्याला स्वतःला सोडवता आले नाही आणि त्याची मान पूर्णपणे ग्रीलमध्ये अडकून पडली. घाबरलेल्या मुलाने आरडाओरडा केल्याने घरातील सदस्य आणि शेजारी तातडीने धावून आले. मात्र मान ज्या पद्धतीने अडकली होती, त्यामुळे इजा न पोहोचवता त्याला बाहेर काढणे कठीण झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून शेजार्यंनी तत्काळ एमआयडीसी अग्निशमन दल यांच्याशी संपर्क साधला.
माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी अत्यंत काळजीपूर्वक आणि शिताफीने ग्रीलचा भाग हाताळत कोणतीही दुखापत होवू न देता मुलाची सुटका केली. काही मिनिटातच प्रयत्नानंतर मुलाला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मुलगा सुखरूप असल्याचे पाहून पालकांसह उपस्थित नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.www.konkantoday.com




