ओखा एक्स्प्रेसमधून पडलेल्या प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू


रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील संगमेश्वर रेल्वेस्थानक परिसरात ओखा एक्स्प्रेसमधून पडून गंभीर जखमी झालेल्या प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मनदोरा रमेश देवजी (वय ४८, रा. जामनगर, गुजरात) असे मृत प्रवाशाचे नाव आहे. ही घटना १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० ते ८.४५ वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर रेल्वेस्थानक येथे घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनदोरा देवजी हे ओखा एक्स्प्रेसने गुजरातहून गोव्याकडे प्रवास करत होते. याच दरम्यान संगमेश्वर स्थानकाजवळ ते रेल्वेतून खाली पडल्याने गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच २० फेब्रुवारी रोजी पहाटे सुमारे ४.४५ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेची नोंद रेल्वे पोलिसांकडून करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button