श्री स्वामी समर्थ सेवा मागचे दुर्ग सवंर्धन अभियान

३५० दुर्गांवर स्वच्छता व देव -देवतांचा मान सन्मान

दि २२ फेब्रुवारी २०२६ रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यातिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित ) व श्री स्वामी समर्थ गुऊपीठ त्र्यंबकेश्वर आयोजीत “पर्यावरण – प्रकृती विभाग” अंतर्गत व्यापक दुर्ग संवर्धन अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानाअंतर्गत राज्यभरातले ३५० पेक्षा अधिक गडदुर्गांवर स्वच्छतेसह विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

दुर्ग सवंर्धन अभियान अंतर्गंत वर्षभर सातत्याने या प्रकारचे काम चालूच असते. परंतू या कार्याला आधिक गती मिळावी म्हणून २२ फेब्रुवारी २०१६ रोजी राज्यभरातील महिला पुरुपा सेवेकरी व भाविक आपल्या भागातील गड दुर्गावर स्वच्छता करून तेथील देव-देवतांचा मान – सन्मानही करणार आहेत. गड – दुर्गांवरील ऐतिहासिक माहिती, पशु -पक्षी, वृक्ष – वेली, आयुर्वेदिक वनस्पती, जैव विविधता इत्यादींची माहिती संकलित करणार आहेत.

तसेच गड – दुर्गांना लागून असलेल्या गावांमध्ये ग्राम अभियान राबवून लोक जागरण करण्यात येणार आहे. नव्या पिढीपर्यंत आपला संघर्षाचा परंतू तेवढाच गौरवशाली, अभिमानास्पद इतिहास पोहोचाव हा एक हेतू या दुर्ग संवर्धन अभियानाचा आहेच.गडाच्या तथा दुर्गाच्या पायाथ्याथी असलेल्या गावातील नागरिकांना प्रबोधन करण्यात येणार आहे.

साडे तीनशे वर्षापुर्वी परक्या, धर्मांध, जुलमी सत्ताचा अत्याचार महाराष्ट्रभर सुरु होता. रयतेला सर्वच असह्य झाले. पण हे सर्व अन्याय, अत्याचार सहन करण्या पलिकडे ते काही करू शकत नव्हत. पैसा, अडका, जमिन, जुमला, माय बहिणीची अब्रू सर्वच धोक्यात होते, या सर्व अराजकातून सुटका करण्यासाठी ईश्वर शक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपाने जन्म घेतला. आणि हिंदवी स्वराज्याची वाटचाल सुरु झाली. जुलमी सत्ता उलथावून टाकण्यात गड – कोट, दुर्गांनी महत्वाची भूमिका बजावली शिवनेरी, तोरणा, पुरंदर, सिंहगड, राजगड, लोहगड, रायगड, हरिहर, प्रतापगड, पन्हाळगड कर्नाळा, देवगिरी, हरिश्चंद्र, रामशेज,बोरगड, सज्जनगड, विशाळगड, साल्हेर असे साडे तीनशेपेक्षा जास्त दुर्ग हिंदवी स्वराज्यासाठी आभूषणे ठरली. परंतू आज या दुर्गांची जी अवस्था आहे, ती पाहता कोणत्याही संवेदनशील माणसाचे मन अस्वस्थ आणि घायाळ झाल्याशिवाय राहणार नाही. या घायाळ अवस्थेतून या शक्ति स्थळांची सुटका करून त्यांना गतवैभव प्राप्त करुन देणे आज मोठे अवघड दिसत आहे. परंतु आहे ती संपत्ती साभाळून ठेवणे हे तर आपल्या हाती आहे. या साठीच श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाने दुर्ग संवर्धन अभियानाच्या माध्यमातून खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे.

या अभियानात समर्थ सेवेकऱ्यांसोबत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन सेवा मार्गाकडून करण्यात आले आहे.

सदरचे अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर राबविण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा २७ गडकिल्ले आहेत, तिथे सुद्धा हे अभियान राबविण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी जवळच्या गड किल्ल्यावर आपला सहभाग नोंदवावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button