
मुलीचा मृतदेह गादीत गुंडाळून आई-वडील गावी निघाले; पोलिसांनी अडवताच बिंग फुटलं,
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वडगाव कोल्हाटी येथील साबळे कुटुंब गावी जात असताना तिसगाव चौफुली येथे त्यांच्या गादीत संशयास्पदरीत्या काहीतरी गुंडाळले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गादीची तपासणी केली. गादी उघडून पाहिले असता त्यामध्ये 20 वर्षीय नंदणी राजू धिवरे या तरुणीचा मृतदेह आढळून आला. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.पोलिसांनी अधिक चौकशी केली असता संबंधित तरुणीच्या सावत्र आई-वडिलांनी, ‘मुलीने गळफास घेतला असून तिचा मृतदेह गावाकडे अंत्यसंस्कारासाठी घेऊन जात होतो,’ अशी माहिती दिली. मात्र, परिस्थिती संशयास्पद वाटत असल्याने पोलिसांनी मृतदेह तातडीने घाटी रुग्णालयात पाठवून शवविच्छेदनासाठी ठेवला आहे. दरम्यान, पुढील तपासासाठी सावत्र आई-वडिलांना ताब्यात घेण्यात आले असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.आम्हाला घरातील साहित्य गावी न्यायचं आहे म्हणत वडगाव पासून तिसगाव चौफुलीपर्यंत रिक्षा भाड्याने केली. रिक्षा चालकाने ड्रम, कपडे व इतर साहित्याबरोबर एका गादीमध्ये काहीतरी गुंडाळलेलं असल्याच दिसलं. सामान भरताना त्याच्या लक्षात आलं, त्याने त्यांना तिसगाव चौफुली येथे सोडताच 112 ला फोन करून सांगितले की, त्या गाधीमध्ये गुंधळून ठेवलेले साहित्य आहे, त्यात काही संशयास्पद आहे. पोलिसानी त्यांना चौफुली येथे चौकशी केली असता पुढील घटना उघड झाली. मुलीचे अफेअर होते. त्यामुळे तिने गळफास घेतला. आम्ही गावी घेऊन निघालो होतो, असे आईचे म्हणणे आहे.




