शिवसेना युवा माजी जिल्हाध्यक्ष मुन्ना देसाईंवर प्रतिबंधात्मक कारवाई


शिवसेना युवा जिल्हाध्यक्षपदाचा नुकताच राजीनामा दिलेले केदार उर्फ मुन्ना देसाई यांच्यावर ग्रामीण पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. यावेळी देसाई यांच्याकडून चांगल्या वर्तणुकीच्या हमीचे बंधपत्र घेण्यात आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत हातखंबा गटामध्ये राजकीय वातावरण तापले होते. यातून काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत हातखंबा गटात शिवसेना पक्षाकडून ऍड. सुयोग कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. यामुळे या गटातून इच्छूक असलेले परशुराम कदम यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दरम्यान परशुराम कदम यांनी शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. यावेळी मुन्ना देसाई यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. या घटनेने हातखंबा येथील राजकीय वातावरण तापले होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button