
रत्नागिरी शिरगाव-बाणखिंड येथे दिवसाढवळ्या घरफोडी
रत्नागिरी शहरानजीकच्या शिरगाव-बाणखिंड येथील फ्लॅट फोडून अज्ञाताने सोन्याचे 90 हजारांचे दागिने लांबवले. घरफोडीची ही घटना सोमवार 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते दुपारी 3.30 वा.कालावधीत घडली आहे.याबाबत स्मित संतोष सुर्वे (53,रा.शिवसृष्टी अपार्टमेंट वसुंधरा बिल्डिंग बाणखिंड शिरगाव,रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, सोमवारी सकाळी 7 वा.त्या फ्लॅट बंद करुन नोकरीवर गेल्या होत्या. दुपारी 3.30 वा.सुमारास त्या नोकरीवरुन घ्ारी परतल्या असता त्यांना आपल्या फ्लॅटच्या दरवाजाचे कुलुप तुटलेले दिसून आले. त्यांनी आतमध्ये जाउन पाहिले असता त्यांना बेडरुममधील लोखंडी कपाटाच्या लॉकरमधील सोन्याची ठूशी,अंगठी,कानातले 2 जोड, असे एकूण 90 हजारांचे दागिने चोरीस गेल्याचे लक्षात आले.



