
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने शिवजयंती निमित्तचिपळूणमध्ये बुधवारी ‘रायगडला जेव्हा जाग येते’
रत्नागिरी, दि. 16 ) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरुवारी होणाऱ्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्याबाबत सांस्कृतिक कार्य संचालनालयाने कळविले आहे. त्यानुसार, चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात बुधवार दि. १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत ‘रायगडला जेव्हा जाग येते’ हे नाटक होणार आहे.
18 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नाट्य तसेच 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिनाच्या अनुषंगाने महाराजांच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत सांस्कृतिक कार्य संचालनालयाने आपल्या पत्रात म्हटले आहे. स्थानिक कलावंत तसेच तंत्रज्ञ यांना व्यासपीठ मिळवून देण्याचाही या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.




