
गुहागर तालुका सरपंच संघटनेच्या उपाध्यक्षपदी वैष्णवी नेटके यांची फेरनिवड
गुहागर तालुका सरपंच संघटनेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी समित सत्यवान घाणेकर, तर उपाध्यक्षपदी आबलोली गावच्या सरपंच वैष्णवी वैभव नेटके यांची फेरनिवड करण्यात आली.
बैठकीच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर नवीन सरपंच झालेल्या सभासदांचा सन्मान करण्यात आला. बैठकीत सचिव पदी जान्हवी धनंजय विखारे, खजिनदारपदी आशीर्वाद दयानंद बावस्कर, कार्याध्यक्षपदी सचिन रामचंद्र म्हसकर यांची निवड करण्यात आली.
सदस्यपदी दिव्या सुमित वनकर, आर्या अमित मोरे, कोमल काशिनाथ मुरमुरे, प्रगती प्रकाश मोहिते, सिया सचिन गुजर, विजय अर्जुन तेलगडे, नारायण धोंडू आग्रे, मानसी मंगेश कदम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संपूर्ण कार्यकारिणीचे गुहागर तालुक्यातील सर्वच समाज घटकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.



