रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयातील आयुष विभागाचा कारभार सध्या रामभरोसे


रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयातील आयुष विभागाचा कारभार सध्या रामभरोसे सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या विभागातील युनानी औषधांचा साठा पूर्णपणे संपला असून उपचारासाठी येणार्या रूग्णांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. एकीकडे सरकार पर्यायी औषधोपचार पद्धतीला प्रोत्साहन देण्याच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे प्रत्यक्षात मात्र औषधाअभावी रूग्णांची मोठी ससेहोलपट होत आहे.
जिल्हा रूग्णालयातील या विभागात दररोज सरासरी १० ते १५ रूग्ण मोठ्या आशेने उपचारासाठी येतात. युनानी तज्ञ डॉक्टरदेखील दररोज बाह्य रूग्ण विभागात (ओपीडी) वेळेवर उपस्थित राहतात. मात्र केवळ औषधे उपलब्ध नसल्याने डॉक्टर फक्त तपासणी करून रूग्णांना सल्ला देण्यापलिकडे काहीही करू शकत नाहीत. विशेष म्हणजे युनानी औषधे ही सहजासहजी खाजगी मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे औषधे नेमकी आणायची कुठून असा संतप्त सवाल रूग्ण आणि त्यांचे नातेवाइक विचारत आहेत. गरिबांसाठी आधार ठरणारा हा सरकारी दवाखाना आता केवळ नावापुरताच उरला आहे. की काय अशी भावना जनमानसात उमटत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button