
मुंबई-गोवा महामार्गावरील अर्धवट कामामुळे चाकरमान्यांची होतेय गैरसोय
मुंबई-गोवा महामार्ग अजूनही प्रगतीपथावर आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पनवेल ते रत्नागिरी हा प्रवास सहा तासांचा असला तरी माणगाव बायपास चिपळूण, संगमेश्वर, पाली आणि लांजा येथील कामांचा अडथळा प्रवाशांना पार करावा लगतो. त्यामुळे काहीवेळा वाहतूक कोंडीलाही सामोरे जावे लागत आहे. अन्यथा पर्यटकांची गाडी महामार्गावरून सुसाट जावू शकते अशी स्थिती आहे.
मुंबईहून मोठ्या प्रमाणात कोकणकर आंगणेवाडी यात्रेसाठी सिंधुदुर्गकडे रवाना होत आहेत. त्यांचा मुंबईहून निघाल्यानंतरचा प्रवास थोडी खुशी, थोडा गम असाच आहे. गेली अनेक वर्षे मुंबई-गोवा महामार्गाचा खडतर प्रवासाचा सामना कोकणात येणार्यांना करावा लागत आहे. यंदा काही ठिकाणी मार्गिका तर काही भागात रस्ता पूर्ण झालेला आहे. त्यामुळे तेवढा त्रास पर्यटकांसह कोकणकरांना झालेला नाही. चिपळुणातील उड्डाणपुलाचे काम काही प्रमाणात रखडलेले आहे. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. तत्पूर्वी माणगांव बायपास येथील अडथळा पार करण्याचे आव्हान असते.www.konkantoday.com




