शरद पवारांची तब्येत बिघडली; उपचारासाठी रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल होणार


पुणे | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तब्येत अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे. प्रकृती अस्वस्थ वाटत असल्याने शरद पवार हे उपचारासाठी पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल होणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील ३० मिनिटांत शरद पवार रूबी हॉल क्लिनिकमध्ये पोहोचणार असून तिथे त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत.
रूबी हॉल क्लिनिकचे ज्येष्ठ डॉक्टर डॉ. सायमन ग्रँट हे शरद पवार यांच्यावर उपचार करणार आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आहे.
शरद पवार यांना काहीसे अस्वस्थ वाटू लागल्याने कार्डीयाक ॲम्ब्युलन्ससह त्यांना बारामतीहून पुण्याकडे खाजगी रूग्णालयात उपचारासाठी आणण्यात येत आहे.
त्यांना कफ आणी खोकला आहे. त्यामुळे श्वास घेण्याचा त्रास होत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नाही.
शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत वैद्यकीय अपडेटची प्रतीक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button