सिंधुदुर्गातील प्रसिद्ध आंगणेवाडी यात्रेसाठी धावणार मडगाव-एलटीटी स्पेशल


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेदरम्यान रेल्वेगाड्यांना प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मडगाव – एलटीटी स्पेशल चालवण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने मंगळवारी सायंकाळी जाहीर केले. स्पेशलच्या चार फेर्‍यांचा समावेश आहे. ४ फेब्रुवारीपासून स्पेशल गाड्यांचे आरक्षण खुले होणार आहे. त्यानुर्सार ०१००४/०१००३ क्रमांकाची मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक स्पेशल ७ आणि ९ फेब्रुवारी रोजी धावेल. मडगाव येथून सायंकाळी ४.३० वाजता सुटून दुसर्‍या दिवशी सकाळी ५.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. परतीला ८ आणि १० फेब्रुवारी रोजी धावणारी स्पेशल लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ७. ५५ वाजता सुटून त्याच दिवशी रात्री १० वाजता मडगाव येथे पोहोचेल. २२ डब्यांची स्पेशल करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलावडे, आडावली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेन, पनवेल आणि ठाणे स्थानकांत थांबेल.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button