वाटद एमआयडीसी शेतकर्‍यांना विश्वासात घेऊनच -पालकमंत्री उदय सामंत यांचे आश्‍वासन.

जिल्हा परिषद वाटद गटातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत पालकमंत्री उदय सामंत यांनी वाटद एमआयडीसी विषयी आपली भूमिका स्पष्ट केली. शेतकर्‍यांच्या संमतीशिवाय आणि विश्वासात न घेता कोणताही प्रकल्प लादला जाणार नाही. स्थानिक शेतकर्‍यांच्या शंका दूर करून, त्यांना योग्य मोबदला मिळाल्याशिवाय येथे एमआयडीसी होणार नाही. विरोधक केवळ संभ्रम निर्माण करण्याचे काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
प्रचारसभेत बोलताना सामंत म्हणाले की, रत्नागिरी प्तगरपालिकेच्या निवडणुकीत ३२ पैकी २९ जागा जिंकून महायुतीने विरोधकांचा पराभव केला. हाच २० कौल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही दिसून येईल. जिल्हा परिषदेवर महायुतीचाच अध्यक्ष बसेल आणि विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नसून, जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत तोपर्यंत ही योजना सुरूच राहील, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
या सभेला सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक, प्रकाश साळवी, राजेश मोरे, जिल्हा परिषद उमेदवार अनुष्का खेडेकर, हर्षदा गावडे, यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button