काजू बी शासन अनुदान अंतर्गत काजू बी अनुदानाचे वितरण होणार


राज्यातील काजू उत्पादक शेतकर्‍यांना काजू बीसाठी शासन अनुदान योजनेअंतर्गत अनुदान वितरीत करण्यासाठी महाराष्ट्र शासन सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे ३० जानेवारी २०२६ पासून मान्यता देण्यात आली असल्याने काजू उत्पादित शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. मात्र ही मान्यता देताना शासनाने या योजनेसाठी जाचक करत असलेल्या अटी व शर्ती तशाच ठेवल्या असल्याने अनेक शेतकरी या योजनेपासून यावर्षीही वंचित राहण्याची चिन्हे आहेत. या योजनेअंतर्गत राज्यातील काजू उत्पादक शेतकर्‍यांना शासनाने सन २०२४ च्या काजू हंगामासाठी विक्री केलेल्या काजू बीसाठी प्रती किलो १० रुपयांप्रमाणे किमान ५० किलो व कमाल २००० किलो या मर्यादेत शासन अनुदान देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार अनुदान देण्यास सुरुवातही केली.
मात्र पात्र लाभार्थी ठरविताना अटी घातल्या गेल्या असल्याने अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकले नाही. यामुळे मंजूर करण्यात आलेला निधी तशाच पडून राहीला होता. शासन निर्णयान्वये सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पित झालेल्या रु.१० कोटी इतक्या निधी पैकी ४ कोटी ९७ लाख ४७ हजार निधी वितरीत करण्यात आलेला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button