
कोकण मार्गावरून धावणार्या एलटीटी-करमाळी १२ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
कोकण मार्गावरून धावणार्या एलटीटी-करमाळी स्पेशलच्या फेर्यांना प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभत असल्याने मुदतवाढ देण्यात आलेली स्पेशल १२ फेब्रुवारीपर्यंत धावणार आहे. ०२११५/०२११६ क्रमांकाची एलटीटी-करमाळी साप्ताहिक स्पेशल दर गुरूवारी रात्री १२ वाजून ५० मिनिटांनी एलटीटीहून सुटून सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी करमाळी येथे पोहचते. परतीच्या प्रवासात दुपारी १.४० -वाजता करमाळी येथून सुटून दुसर्या दिवशी रात्री १२ वाजून १० मिनिटांनी एलटीटीला पोहचते. स्पेशलला ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कुडाळ, करमाळी आदी स्थानकात थांबे आहेत.
www.konkantoday.com




