कोकण रेल्वे मार्गावर माघ महोत्सवासाठी योगनगरी ऋषिकेश-एर्नाकुलम धावणार


दक्षिण रेल्वेवरील तिरुनावया स्थानकावर माघ महोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी योगनगरी ऋषिकेश-एर्नाकुलम आरक्षित स्पेशल चालवण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले.
त्यानुसार ०४३६०/०४३५९ क्रमांकाची योगनगरी ऋषिकेश-एर्नाकुलम अनारक्षित स्पेशल शुक्रवारी धावली. योगनगरी ऋषिकेश येथून सकाळी ७ वाजता सुटलेली स्पेशल तिसर्‍या दिवशी रात्री ११.३० वाजता एर्नाकुलम येथे पोहचणार आहे. परतीच्या प्रवासात ३ फेब्रुवारी रोजी धावणारी स्पेशल एर्नाकुलम येथून रात्री ११ वाजता सुटून चौथ्या दिवशी सायंकाळी ४.१५ वाजता योगनगरी ऋषीकेश येथे पोहचेल. १८ डब्यांची स्पेशल वसई मार्गे धावणार आहे. पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम, मडगाव, कारवारसह पुढील थांबे घेत.. एर्नाकुलमला पोहचेल.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button