
कोकण प्रदेशाध्यक्ष अनिरुद्ध शिवराम कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार,
आदरणीय सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन सेनेने रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिंदे सेनेला जाहीर पाठिंबा घोषित केला आहे.
या निर्णयामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नवी राजकीय समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे. रिपब्लिकन सेनेच्या या जाहीर पाठिंब्यामुळे शिंदे सेनेला स्थानिक पातळीवर मोठे बळ मिळणार असल्याचे मानले जात आहे.




