मांडकी पालवण येथील ग्रामीण, कृषी, सहकार साहित्य संमेलनाची जय्यत तयारी सुरू


ग्रामीण साहित्य, कृषी, सहकार आणि समाज जीवनाशी निगडित विषयांवर सखोल चर्चा घडवून आणणारे राज्यातील पहिलेच आगळेवेगळे ग्रामीण, कृषी, सहकार मराठी साहित्य संमेलन १३ ते १५ फेबुवारी दरम्यान मांडकी-पालवण येथे रंगणार आहे. कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण संस्थेच्या क्रीडांगणावर रंगणार्‍या या संमेलनाच्या उदघाटनाला माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री उदय सामंत, तर समारोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह राजकीय नेतेमंडळी, साहित्यिक उपस्थित राहणार आहेत.
पहिल्याच भव्य साहित्य संमेलनाच्या कार्यक्रम पत्रिकेनुसार उद्घाटनापासून समारोपापर्यंत विविध सत्रांमध्ये साहित्यिकांसह सार्वजनिक जीवनातील मान्यवर नेतेमंडळी सहभागी होत असून, साहित्याच्या व्यासपीठाला व्यापक प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. १३ फेबुवारी रोजी दुपारी ३ वाजता ध्वजारोहणाने संमेलनाची सुरुवात होणार असून त्यानंतर ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन, सायंकाळी कवी कट्टा होणार आहे. १४ रोजी सकाळी १० वाजता माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्याहस्ते संमेलनाचे उदघाटन होणार असून यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री उदय सामंत, राज्य साहित्य वं संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ, सदानंद मोरे, संमेलनाध्यक्ष कृषीभूषण तानाजीराव चोरगे, स्वागताध्यक्ष कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ, संजय भावे, गृहराज्यमंत्री योगेश कदम, व खासदार नारायण राणे यांच्यासह सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button