रत्नागिरीचे ज्येष्ठ रंगकर्मी सुहास भोळेंसह अनेक स्थानिक कलावंत झळकणार नव्या चित्रपटात

रत्नागिरी : ‘रणपती शिवराय स्वारी आग्रा’ या शिवराज अष्टक मधील सहावा भव्य ऐतिहासिक चित्रपट ३० जानेवारी रोजी संपूर्ण जगभर प्रदर्शित होत आहे. या भव्यदिव्य चित्रपटात सुहास भोळे भिल्ल प्रमुखाच्या भूमिकेत आहेत. त्यांच्यासह अमित तोडणकर, अर्जून बेंड्ये, ओंकार ठीक, गौरेश गवस, तेजस खरे, प्रदीप रेवाळे, महेश गिरकर, महेश पवार, यतीन नेवरेकर, राज डोर्लेकर, शरद आग्रे, शिवम पाटील, सखाराम घाणेकर, सचिन काष्टे, सचिन शितप, सौरभ घरट, स्वरूप हर्डिकर आदी कलावंतांच्या भूमिका आहेत.


या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक तसेच गीतकार स्वतः दिग्पाल लांजेकर असून त्यांची एक महत्वाची भूमिका चित्रपटात आहे. या चित्रपटाचे निर्माते कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, विपुल अग्रवाल, जेनिल परमार व मुरलीधर छटवाणी हे आहेत. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अभिजित श्वेतचंद्र यांनी साकारली आहे. त्यांच्या सोबत मृणाल कुलकर्णी, पुन्नीत इस्सार, अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, दिग्पाल लांजेकर, प्रसन्न केतकर, ऋषी सक्सेना, सचिन देशपांडे, निखिल राऊत, योगेश सोमण, स्मिता शेवाळे, नुपुर दैठणकर, सुहास भोळे यांच्या सह अनेक छोटे मोठे कलावंत सहभागी झाले आहेत.
या चित्रपटासाठी अवधूत गांधी व मयुर राऊत यांनी संगीत दिले आहे, तर गायनाची बाजू अवधूत गांधी व अमिता घुगरी यांनी सांभाळली आहे. संगीत हक्क पॅरानोमा म्युझिक कंपनीकडे आहेत.
आबालवृद्धांना छत्रपतींचा इतिहास अनुभवता यावा यासाठी शिवराज अष्टकाची निर्मिती दिग्पाल लांजेकर यांनी गेली अनेक वर्षे सुरू ठेवली आहे. रत्नागिरीच्या कलावंतांना चित्रपट गृहात जाऊन आपण प्रोत्साहीत करावे. यापासून स्फूर्ती घेऊन अधिकाधिक कलावंत चित्रपटाकडे वळू लागतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button