
सैन्यातील निवृत्ती वेतन मिळत नसलेल्या 65 वर्षावरील सैनिकांची/विधवांची माहिती दि. 30 जानेवारीपर्यंत द्या.
रत्नागिरी, दि. 20 ) : माजी सैनिक व्याख्येत न येणारे तसेच सैन्यातील निवृत्ती वेतन मिळत नसलेल्या 65 वर्षावरील सैनिकांची/विधवांची माहिती दि. 30 जानेवारी 2026 रोजी पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात स्वत: उपस्थित राहून सादर करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केली आहे.
आर्मी नंबर, रँक व नाव, भरतीची तारीख, निवृत्तीची तारीख, निवृत्तीचे कारण , चारित्र्य, युध्दात सहभाग असल्यास तपशिल याची माहिती आवश्यक आहे.
सैन्य सेवा केलेले परंतु सैनिक व्याखेत न बसणारे 65 वर्षांवरील व्यक्ती (विधवांसाठी वयाची अट नाही), सैन्यसेवेतून बडतर्फ झालेला नसावा. केएसबी/झेडएसबी कडून चरितार्थासाठी आर्थिक मदत मिळण्यास पात्र नसलेला, अर्धसैनिक बल मधील नसावा. Territorial Army मध्ये सेवा केलेल्या सैनिकांचा समावेश करावा. चरितार्थासाठी उत्पन्नाचे काहीही साधन नसलेल्या व्यक्तींचाच समावेश करावा.
000




