’मिशन फिनिक्स’ उपक्रमाने अंमली पदार्थ तस्करांमध्ये खळबळ


रत्नागिरी जिल्ह्याला पूर्णपणे नशामुक्त करण्यासाठी आणि तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने ’मिशन फिनिक्स’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविला आहे. पोलीस अधिक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली दि. २५ मेपासून ही मोहीम जिल्हाभरात प्रभावीपणे सुरू असून, अमली पदार्थ तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
या मोहिमेंतर्गत अंमली पदार्थांचे सेवन, साठवणूक आणि वितरण रोखण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. आतापर्यंत एकूण ४८ गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यामध्ये अंमली पदार्थ सेवनाचे २४ व ताब्यात बाळगण्याचे २४ गुन्हे आहेत. या कारवाईत ७० आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ब्राऊन हेरोईन, चरस आणि गांजा यांसारखे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ३२ लाख ७३ हजार ९८९ रुपये इतकी आहे.
नवीन कारवायांसोबतच जुन्या गुन्ह्यांमधील जप्त मालाची विल्हेवाट लावण्याचे कामही पोलिसांनी काटेकोरपणे केले आहे. २६ डिसेंबर रोजी ड्रग्ज डिस्पोजल समितीचे अध्यक्ष नितीन बगाटे यांच्या उपस्थितीत सन २०२० ते २०२५ या कालावधीतील ६५ गुन्ह्यांमधील १८१ किलो १४१ ग्रॅम अंमली पदार्थ (गांजा, चरस, ब्राऊन हेरोईन व एम.डी.) पुणे येथील रांजणगाव एमआयडीसी येथे सुरक्षितपणे जाळून नष्ट करण्यात आले.
केवळ पोलिसी कारवाई  पुरेशी नसल्याचे लक्षात घेऊन ’मिशन फिनिक्स’ अंतर्गत जनजागृतीवरही भर देण्यात आला आहे. कॉलेज विद्यार्थी व स्थानिक नाट्यगटांच्या मदतीने बस स्थानके, शाळा, चौक आदी ठिकाणी पथनाट्य सादर करून अमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती दिला जात आहे. यासोबतच सायकल रॅली, बाईक रॅली, मॅरेथॉन तसेच सोशल मीडिया माध्यमांतून जनजागृतीपर व्हिडिओ व रील्स प्रसारित करण्यात येत आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button