
नगर सेवक श्री केतन उमेश शेट्ये व महानगर गॅस लिमिटेडचा यांच्या कोकणनगर रत्नागिरी प्रभाग क्र ४, येथील महिलांसाठी सुमारे ३,०००००( तीन लाख) रक्कमेची कॅन्सर चाचणी मोफत

रत्नागिरी – महिलांच्या आरोग्यसेवेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत, महिलांसाठी गर्भाशयमुखाच्या कर्करोगाची मोफत एचपीव्ही डीएनए चाचणी शिबीर कोकण नगर प्रभाग क्र ४ चे नगर सेवक श्री केतन शेट्ये व महानगर गॅस लिमिटेड यांच्या द्वारे रत्नागिरी प्रभाग क्र ४ येथील धनंजय किर सभागृह नगर परिषद वसाहत येथे १८ जानेवारी रोजी संपन्न झाला. पुण्यातील सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी पार्कने त्यांच्या इनक्यूबेटी कंपनी आयुजेन बायोसायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांसाठी गर्भाशयाच्या कर्करोग जागरूकता आणि तपासणी कार्यक्रम यशस्वीरित्या राबविला आहे.

महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल)च्या “एमजीएल आरोग्य प्रोग्राम” या सी. एस. आर कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या या उपक्रमाचा उद्देश महिलांमधील २ क्रमांकाचा गर्भाशय मुखाचा कर्करोग जो की टाळू शकतो त्याच्या लवकर निदान आणि प्रतिबंध करण्यास प्रोत्साहन देणे होता. ३० वर्षे व त्या पेक्षा जास्त वयावरील सुमारे १०० महिलांची एचपीव्ही टेस्ट करण्यात आली. या टेस्टने गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचा प्रतिबंधक करता येतो.

ही चाचणी करण्यासाठी ३ हजार रुपये खर्च असतो व चाचणी मुंबई, पुणे किंवा कोल्हापूर अश्या मोठया शहरात सहजरीत्या उपलब्ध होतात पण रत्नागिरीत अश्या चाचण्या सहज उपलब्ध होत नाहीत त्याच अनुषंगाने नगरसेवक केतन शेट्ये यांनी ही चाचणी आपल्या प्रभागातील महिलांसाठी मोफत उपलब्ध करून दिली. श्री शेट्ये यांनी म्हटले आज प्रभाग क्र ४ मधील नागरिकांनी प्रत्येक निवडणुकीत आम्हला भरघोस मतांनी निवडून दिले आहे. प्रभागात रस्ते,पाणी,गटार व इतर समस्या नेहमीच सोडवल्या जातात पण जे नागरिक आम्हाला भरभरून मतदान करतात त्यांची आरोग्याची काळजी घेण्यास पण नगरसेवक म्हणून आम्ही बांधील आहोत. त्याच हेतू ने आम्ही नागरिकांच्या आरोग्य समस्याना प्राधान्य देतोय जेणे करून प्रभागातील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहील.
यावेळी शिबिराला प्रमुख पाहुण्या म्हणून प्रभाग क्र ४ च्या नगरसेविका सौ फौजिया मुजावर,आयुजेन बायोसायन्सेस लॅब पुणे,चे व्यवस्थापक डॉक्टर श्री.अभय वैद्य व त्यांची संपूर्ण टीम, रत्नागिरी कर्मचारी गृहनिर्माण संस्था यांचे अध्यक्ष व नामवंत व्यवसायिक श्री किशोर भुते अश्या मान्यवरांची उपस्थित लाभली व आयोजकांमार्फत मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी सुमारे ११० महिलांनी योजने चा लाभ घेतला असून कार्यक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला हनुमान मित्र मंडळाच्या सदस्या श्रीम. कामिनी महाडिक यांनी नगरसेवकांमार्फत प्रभागात होणाऱ्या भविष्यातील इतर सामाजिक उपक्रम व १७ जानेवारी ला नगर परिषद वसाहत येथे नागरिकांसाठी आयुष्यमान कार्ड योजनेचा शिबीर राबवण्यात आला ज्या मध्ये सुमारे ८० नागरिकांनी योजनेचा लाभ घेतला याची माहिती दिली.
डॉक्टर श्री.अभय वैद्य यांनी माहिती देताना सांगितले की भारतातील महिलांना होणाऱ्या कर्करोगांमध्ये गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात सामान्य कर्करोग आहे, ज्यामध्ये ३० ते ६० वयोगटातील महिलांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. ग्रामीण भागात या आजाराचे प्रमाण थोडे जास्त आहे. दरवर्षी, भारतात गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगामुळे जवळजवळ १,३०,००० नवीन रुग्ण आणि ७४,००० मृत्यू होतात. सुरुवातीच्या टप्प्यात त्याचे लक्षणे नसलेले स्वरूप पाहता, मृत्युदर कमी करण्यासाठी स्क्रीनिंग कार्यक्रमांद्वारे लवकर निदान करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे यावेळी सांगितले.
सदर शिबिराचे आयोजनासाठी महापुरुष मित्र मंडळ कोकण नगर, हनुमान मित्र मंडळ नगरपरिषद वसाहत, समता मित्रमंडळ कीर्ती नगर, पत्रकार सौ. मेहरुनिस्सा साखळकर यांनी विशेष मेहनत घेतली. व कार्यक्रम चा समारोप चहा पानाने करण्यात आला.




