
चक्कर येउन पडल्यामुळे डोक्याला गंभिर दुखापत होउन वृध्दाचा मृत्यू
दुचाकीवरुन रत्नागिरी ते खंडाळा जात असताना अचानकपणे चक्कर येउन पडल्यामुळे डोक्याला गंभिर दुखापत होउन वृध्दाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवार 15 जानेवारी रोजी दुपारी 12.15 वा.सुमारास घडली.लकू हरिश्चंद्र राठोड (70,रा.मांडवी,रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या वृध्दाचे नाव आहे. गुरुवारी दुपारी लकू राठोड हे आपल्या ताब्यातील दुचाकीवरुन रत्नागिरी ते खंडाळा असे जात होते. ते वरवडे ब्रिजच्या पुढे आले असता त्यांना अचानकपणे चक्कर आल्याने ते दुचाकी रस्त्याच्या साईडला थांबवत असताना ते दुचाकीवरुन खाली पडले. यात त्यांच्या डोक्याला गंभिर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र खंडाळा येथे दाखल करण्यात आले असता तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले




