दापोली-खेड महामार्गावरील तो पूल मृत्यूचा सापळा, 50फूट खोल दरीत वाहन जाण्याची भीती


दापोलीः- दापोली ते खेड महामार्गावर नवशी फाटयाजवळ असलेला पूल सध्या वाहनधारकांसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. पुलाच्या बाजुला मोठया प्रमाणात उत्खनन झाले असून, पुलाला कोणतेही मजबूत संरक्षक कठडे नाहीत. प्रशासनाने केवळ पत्रे लावून या ठिकाणी संरक्षणाचे सोपस्कार पूर्ण केले आहेत. मात्र हे पत्रे कोणत्याही अपघाताला रोखण्यास असमर्थ आहेत.
प्रशासन दुर्घटनेची वाट पाहतंय का? या पुलावरून प्रवास करताना वाहनधारकांच्या मनात धडकी भरत आहे. 50 फूट खोल दरी आणि बाजूला केवळ पातळ पत्रे यामुळे एखादे वाहन अनियंत्रित झाले तर थेट दरत कोसळू शकते. एखाद्याचा जीव गेल्यावरच संबंधित विभागाला जाग येईल का? असा संतप्त सवाल स्थानिक आणि प्रवासी करत आहेत. या मार्गावरून अवजड वाहनांचीही मोठी वर्दळ असते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
फोटो डिपी 15-01 नवशी येथील धोकादायक पूल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button