
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त स्पर्धा
कोमसाप'तर्फे आयोजन...
रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या (कोमसाप) रत्नागिरी शाखेच्या वतीने १४ ते २८ जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
युवा गटासाठी (१८ ते ३० वर्षे) ‘माझी मराठी शाळा’ याविषयावर, तर खुला गटासाठी (३० वर्षांपुढील) ‘राजकारण दिशा व दशा’ या विषयावर काव्य लेखन स्पर्धा होणार आहे. काव्य लेखनासाठी मर्यादा २० ओळी अशी आहे. ही स्पर्धा १६ जानेवारी
रोजी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात (रत्नागिरी) होणार आहे. या स्पर्धेसाठी
डॉ. आनंद आंबेकर (7020737400) आणि गौरी सावंत-सावेकर (9673719568) यांच्याशी संपर्क साधावा.
वक्तृत्व स्पर्धेत युवा गटासाठी ‘माझी मायबोली मराठी’, तर खुल्या गटासाठी ‘हे विश्वची माझे घर’ हे विषय आहेत. स्पर्धेसाठी सात मिनिट वेळ असणार आहे. ही स्पर्धा १४ जानेवारीला सकाळी १० ते २ यावेळेत पटवर्धन हायस्कूल येथे होणार आहे. स्पर्धेसाठी विनायक हातखंबकर (9970323545), राजेंद्र कदम (7798310033), श्रद्धा बोडेकर (8668709390) यांच्याशी संपर्क साधावा.
कथाकथन स्पर्धेत युवा गटासाठी ‘ग्रामीण कथा’, तर खुल्या गटासाठी ‘संस्कार कथा’ हे विषय आहेत. स्पर्धेसाठी सात मिनिटे वेळ आहे. ही स्पर्धा १५ जानेवारीला अ. के. देसाई हायस्कूल येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी अंजली पिलणकर (9405690384), चंद्रमोहन देसाई (9764796676), विद्याधर कांबळे (8459455472) यांच्याशी संपर्क साधावा.
या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष प्रा. चंद्रमोहन देसाई, सचिव विद्याधर कांबळे यांनी केले आहे.




