रत्नागिरीतील खालची आळी येथील मारुती कॉमन क्लबच्या वतीनेभव्य ‘ढोल वादन स्पर्धा २०२६’ चे आयोजन


रत्नागिरीतील खालची आळी येथील मारुती कॉमन क्लबच्या वतीने माघी गणेशोत्सवाचे ५० वे वर्ष (सुवर्ण महोत्सव) उत्साहात साजरे केले जात आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शनिवार, दि.१७ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता भव्य ‘ढोल वादन स्पर्धा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा मुरलीधर मंदिर पटांगण, खालची आळी, रत्नागिरी येथे पार पडणार असून ढोल वादनातील कौशल्याला व्यासपीठ मिळवून देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येईल.

याव्यतिरिक्त उत्कृष्ट ढोलवादक, उत्कृष्ट ताशावादक आणि उत्कृष्ट वेशभूषा अशा विशेष श्रेणींसाठीही आकर्षक चषक प्रदान केले जाणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करण्याची अंतिम मुदत १५ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत आहे. नाव नोंदणीसाठी इच्छुक स्पर्धकांनी श्री. सतीश बाम (९४०३९ ३६८२९), श्री. दर्शनशेठ खानोलकर (९१५८१ २८११४) किंवा श्री. शैलेंद्र भाटवडेकर (८५५१८ ८२३३३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मारुती कॉमन क्लबच्या वतीने करण्यात आले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button