दुचाकीच्या डिक्कीत मिळाले जिवंत हॅण्डग्रेनेड, ठाण्यात मोठा घातपात घडवण्याचा कट?


ठाण्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेवर गोळीबार केल्या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली. पण अरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या दुचाकीची तपासणी केली. यावेळी त्याच्या सीटखाली असलेल्या डिक्कीत जिवंत हॅण्डग्रेनेड सापडलं. त्यामुळे आरोपीचा काही घातपात घडवण्याचा बेत होता का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आरोपीला हे हॅण्डग्रेनेड नेमकं कुठे मिळालं? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणात पोलीस तपासातून मोठी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाकडे आता सपूर्ण राज्याचं लक्ष लागण्याची शक्यता आहे.

महिलेवर गोळीबार झाल्याच्या प्रकरणात मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांनी दिव्यातून ताब्यात घेतलेल्या एका आरोपीकडील दुचाकीच्या डिक्कीत एक जिवंत हॅण्ड ग्रेनेड मिळाल्याने खळबळ उडाली आहे. बॉम्ब शोधक, नाशक पथकाने हॅण्डग्रेनेड निकामी केले असून या प्रकरणी आरोपीविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीकडे हॅण्डग्रेनेड आले कोठून? याचा तपास पोलीस करीत आहेत.

दिव्यातील साबेगावमध्ये राहणारा आरोपी शिवशंकर राममुरत विश्वकर्मा उर्फ बबलू याच्याविरुद्ध मुंबईतील पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात शिक्षा भोगल्यानंतर हा आरोपी दिव्यात राहण्यास आला. २ जानेवारी रोजी त्याने एका महिलेवर गोळीबार केल्याची तक्रार मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील वालिव पोलिसांकडे आली होती. तांत्रिक विश्लेषणानंतर शिवशंकर दिव्यातील साबेगाव येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलीस दिव्यात धडकले. आणि या आरोपीला ताब्यात घेतले.

चौकशीत आरोपीने गोळीबार केल्याची कबुली दिली. आरोपीने गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीची पोलिसांनी तपासणी केल्यानंतर दुचाकीच्या सीटखालील डिक्कीमध्ये एक जुने हॅण्ड ग्रेनेड मिळाले. वालिव पोलिसांनी ही माहिती मुंब्रा पोलिसांना दिली. घटनास्थळी ठाणे पोलिसांचे बॉम्ब शोधक, नाशक पथक दाखल झाले. या पथकाने हॅण्ड ग्रेनेडची तपासणी केल्यानंतर हॅण्ड ग्रेनेड जिवंत असल्याची बाब स्पष्ट झाली.

नंतर संबधित हॅण्ड ग्रेनेड निकामी करण्यात आले. वालिव पोलिसांच्या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सध्या आरोपी चौकशीसाठी वालिव पोलिसांच्या ताब्यात आहे. स्फोट घडवून आणण्यासाठी किंवा मानवी जिवीतास तसेच मालमत्तेस धोको पोहोचवण्याच्या हेतून आरोपीने हॅण्ड ग्रेनेड बाळगल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button