प्रतापगड दर्शनानंतर महाबळेश्वरकडे जाणारी सहलीची खासगी आराम बसआंबेनळी घाटात कलंडली


प्रतापगड दर्शनानंतर महाबळेश्वरकडे जाणारी सहलीची खासगी आराम बस आंबेनळी घाटात कलंडल्याची घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली. सुदैवाने दरीच्या बाजूऐवजी रस्त्यालगत डोंगराच्या बाजूच्या चरामध्ये सहलीची बस कलंडल्याने मोठा जीवघेणा अपघात टळला. यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही.
समर्थ ट्रॅव्हल्सची खासगी रामेश्वर आराम बस (एमएच ४७ वाय ७९९२) ही सहलीच्या विद्यार्थ्यांना घेऊन प्रतापगड दर्शनानंतर महाबळेश्वरकडे जात होती. आंबेनळी घाटात आराम बसचा टायर रस्त्यालगत खोदण्यात आलेल्या चरात अडकल्याने बसचा पुढील टायर अधांतरी राहिला. या प्रकाराने आराम बसमधील विद्यार्थी आणि शिक्षकांचा भीतीने थरकाप उडाला. सुदैवाने अपघातात विद्यार्थी, शिक्षक व चालकक यांना कोणतीही दुखापत झाली नाही.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button