परीक्षेत कमी गुण पडल्याने विषारी औषध प्राशन केलेल्या १७ वर्षीय युवतीचा काेल्हापूर येथे उपचारादरम्यान मृत्यू


बारावीच्या परीक्षेत कमी गुण पडल्याने विषारी औषध प्राशन केलेल्या १७ वर्षीय युवतीचा काेल्हापूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा प्रकार राजापूर तालुक्यातील एका गावात ३० नाेव्हेंबर राेजी घडला होता.तालुक्यातील एका गावातील बारावीत शिकणाऱ्या युवतीला बारावीच्या परीक्षेत अकाउंट व इंग्रजी विषयामध्ये कमी गुण पडले. त्यामुळे ती नापास झाल्याने तणावाखाली हाेती. त्याच तणावाखाली ती घरी आली आणि तिने घरातील फवारणीचे औषध घेतले.

ही गाेष्ट तिच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी तिला तातडीने लांजा येथील रुग्णालयात दाखल केले हाेते. त्यानंतर अधिक उपचारांसाठी रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले हाेते. तिथून काेल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करून तिच्यावर उपचार सुरू हाेते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button