
इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये जलतरणपटू नोंद झालेली वेदा सरफरेचा ठाकरे शिवसेनेतर्फे आज सत्कार
भारतातील कमी वयाची जलतरणपटू इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झालेली रत्नागिरीतील १ वर्ष ९ महिने दहा दिवसांची वेदा परेश सरफरे हिने १०० मी. अंतर अवघ्या १० मिनीटे ८ सेकंदामध्ये पार करून जागतिक विक्रम केला आहे. यानिमित्त तिचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सत्कार केला जाणार आहे.
हा कार्यक्रम आज (१६ डिसेंबर) सकाळी ११ वाजता शिवसेना नेते तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या अभ्युदयनगर येथील संपर्क कार्यालयात होणार आहे.
यावेळी रत्नागिरी तालुक्यातील शिवसेना, महिला आघाडी, युवासेना सर्व उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांनी केले आहे.




