हातखंबा ईश्वर ढाबा येथे वाहनाच्या धडकेत एका पादचाऱ्याचा मृत्यू


मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा ईश्वर ढाबा येथे वाहनाच्या धडकेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास घडली. अंतराम्मु चौधरी (५५, नेपाळ), असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की, चौधरी हा हातखंबा ते निवळी असा पहाटेच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावरून चालत जात होता. यावेळी ईश्वर ढाबा येथे गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनाने त्याला पाठीमागून जोरदार धडक दिली. तो जागीच ठार झाला. घटनास्थळी गाडीचे पार्ट पडलेले दिसून येत आहेत. सकाळी तो मृतावस्थेत दिसून आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button