
सडे जांभारी येथे रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन
गुहागर तालुक्यातील सडे जांभारी येथील देऊळवाडी – मावळतवाडी या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन शिवसेनेचे गुहागर तालुक्यातील प्रभावी नेतृत्व आणि जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष महेश नाटेकर यांच्या हस्ते नुकतेच उत्साहात झाले.
या प्रारंभी रस्त्याच्या कामाचा आराखडा, निधीची तरतूद याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करून विधिवत पूजा करून महेश नाटेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले. रस्त्याचे डांबरीकरण होणार असल्याने परिसरातील ग्रामस्थांना व विशेषतः रुग्णांना गाडीने प्रवास करण्यासाठी मोठा फायदा होणार आहे.
रस्त्याच्या डांबरीकरणामुळे या गावातील परिसरातील सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करून महेश नाटेकर यांनी गावाच्या प्रगतीसाठी दर्जेदार रस्ते ही एक प्राथमिक गरज ओळखून आम्ही वेळेत आणि गुणवत्ता पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी स्थानिक ग्रामस्थ कृष्णा वेलुंडे, शंकर वेलुंडे, गणपत वेलुंडे, पांडुरंग बारस्कर, मधुकर वेलुंडे, नामदेव वेलुंडे, गोविंद वेलुंडे, संतोष वेलुंडे, सुनीता वेलुंडे, प्रीती वेलुंडे, वनिता वेलुंडे, वृषाली वेलुंडे, समीक्षा वेलुंडे, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम निवाते, विजय वैद्य, प्रदीप सुर्वे, विजय मोहिते आदी उपस्थित होते.




